खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ वा. शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे.
बैठकीत येत्या १७ जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात तसेच अध्यक्षांच्या परवानगी देणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक जनतेने व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. ए. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे व सरचिटणीस सीताराम बेडरे यांनी केले आहे.
0 Comments