विजयपूर / वार्ताहर
विजयपूर शहरातील कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघातर्फे श्री सिद्धेश्वर स्वामीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील नवीन जि. पं. कार्यालयानजीक असलेल्या पत्रकार संघाच्या कार्यालयात आज झालेल्या शोकसभेत पत्रकार बांधवांनी स्वामीजींच्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
या शोकसभेला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश छुरी, प्रधान कार्यदर्शी मोहन कुलकर्णी, खजिनदार राहुल आपटे, सह खजिनदार दीपक शिंत्रे, श्रीकांत पुकसद, लिंगप्पा नावी, देवेंद्र मेत्री कौशल्या पर्नाळकर, चिदंबर कुलकर्णी यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments