लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळण्यासाठी कर्नाटकाप्रमाणेच इतर राज्यातही आंदोलन करण्यात येत आहे. या मागणीसाठी येत्या 29 जानेवारी रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन केल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भूशीकर यांनी दिली.
बेळगावात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश भूशीकर म्हणाले, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेला संघर्ष देशात गाजत आहे. त्यानुसार मुंबईत विशाल लिंगायत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर रॅली होत आहे. या रॅलीत किमान पाच लाख लिंगायत बांधव सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ पहा 👇
कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रात लिंगायत धर्मियांची दीड कोटी लोकसंख्या असून, लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची त्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील दहा प्रमुख जिल्ह्यांत लिंगायत लोक राहतात. लिंगायत धर्म संस्थापक बसवण्णा यांचे महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे काही काळ वास्त्यव्य होते. त्यामुळे तेथे गुरु बसवण्णा यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, राष्ट्रीय पातळीवर त्यांना अल्पसंख्यांक घोषित करावे या व अन्य मागण्यांसाठी येत्या 29 जानेवारी रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन केल्याचे अविनाश भूशीकर यांनी सांगितले. गुरु बसवण्णा यांनीच जगाला लोकशाही व्यवस्थेची देणगी दिली आहे. त्यामुळे तयांनी दाखविलेल्या लोकशाहीच्या मार्गावरूनच आम्हाला ब्याय मिळेपर्यंत हा लढा सुरु ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोटी, शंकर गुडस आदी उपस्थित होते.
0 Comments