विजयपूर / वार्ताहर 

दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी गतिरोधकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील कारजोळ क्रॉसनजीक बबलेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत काल शनिवारी रात्री उशिरा ही  घटना घडली .

रुद्रय्या मल्लय्या हिरेमठ (वय ४८, रा. जनमट्टी ता. बैरागी, जि.  बागलकोट) असे मृत दुचाकी स्वराचे नाव आहे. दुचाकी स्वराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. या अपघाताची नोंद बबलेश्वर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.