धारवाड / वार्ताहर
राज्यातील शेतकऱ्यांना माती आणि पाणी परीक्षण, कीड आणि रोगांचा शोध, रोग नियंत्रण उपाय याविषयी जनजागृती आणि उपाय करण्यासाठी फिरत्या रोप चिकित्सालयांची संकल्पना राज्य सरकारने पुढे आणली आहे. कृषी आणि बागायती पिकांच्या उत्पादनासाठी हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे.
माती आणि पाणी परीक्षण, कीड आणि रोगांचा शोध, रोग नियंत्रण उपाय याविषयी जनजागृती आणि उपचारांसाठी 64 कृषी संजीवनी वाहनांचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी मंत्री बी. सी. पाटील, ऊस व साखर उद्योग मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प, आमदार अरविंद बेल्लद, सिद्धू सवदी, अमृत देसाई, तवनप्पा अष्टगी आदी उपस्थित होते.
0 Comments