बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील शिवबसवनगर येथील एस.जे.बाळेकुंद्री हॉलमध्ये २२ वे अखिल भारतीय कवयित्री संमेलन २८ जानेवारीपासून तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लेखिका ज्योती बदामी यांनी दिली.
बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना लेखिका ज्योती बदामी म्हणाल्या की, आशा कोरे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. या तीन दिवसीय संमेलनात विविध मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो साहित्यरसिक यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नागनूर रुद्राक्षी मठाच्या श्री अल्लम प्रभू स्वामीजींच्या हस्ते कवयित्री संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कन्नड कविता, शोधनिबंध सादरीकरण, बहुभाषिक काव्य संमेलन होणार आहे. सायंकाळी आसाम, राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतील विविध भागांतील कला संस्कृतीचे सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजनंदा घार्गी, जयशिला ब्याकोड, आशा कडपट्टी, आरती अंगडी आदी उपस्थित होते.
0 Comments