सांबरा / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावात आज मंगळवारी एक गाव एक नागरी सेवाकेंद्र अंतर्गत नूतन नागरीसेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनानंतर बोलताना आ.लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या,या सेवा केंद्रातून जनतेला अनेक सेवा मिळू शकतात, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, बस रेल्वे आणि विमान तिकिटे उपलब्ध होऊ शकतात. सर्व प्रकारचे ऑनलाइन अर्ज भरता येतात. त्यामुळे लोकांचे श्रम आणि वेळ वाचेल तेव्हा ग्रामस्थांनी याचा सदुपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.