• आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पुढाकार  

खानापूर / प्रतिनिधी 

लंम्पीस्किन सारख्या त्वचारोगामुळे खानापूर तालुक्यातील गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत आ. डॉ.अंजली निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन खानापूर तालुक्यात त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे आदेश जारी करून धीर दिला आहे. तसेच शासनाकडूनही त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

खानापूर तालुक्यात आतापर्यंत  १७३ गुरे त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडली असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९९ जणांना  नुकसान भरपाई देण्यात येत असून उर्वरित  ७४ जणांना  आठवडाभरात नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताकरिता गुरांसाठी ५ हजार रुपये, गायीसाठी २० हजार रुपये आणि बैलांसाठी ३० हजार रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती आ. डॉ. अंजली निंबाळकर  यांनी दिली आहे.