बेळगाव / प्रतिनिधी
हिंदूनगर, टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती उमा प्रभाकर कलघटगी (वय 86) यांचे आज गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्री समादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर शं. कलघटगी यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या सासू तसेच लोंढा जि.पं.चे माजी सदस्य उमाकांत ल. कपिलेश्वरी यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments