बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांचा 82 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज सोमवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल किरण देसाई यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील लोमॅक्स वृद्धाश्रमाला भेट देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तेथील वृद्धांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई यांच्यासह सरचिटणीस ज्योतिबा चव्हाण -पाटील, श्याम मन्तेरो, गौतम कांबळे, दुर्गेश मेत्री, विनायक पाटील, सदानंद पाटील, राजू पाटील, इस्माईल मुल्ला, धनपाल अगशीमनी, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष प्रभावती भालेकर, शुभांगी पवार, प्रेमा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.