पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेन यांचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे.
0 Comments