- विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील घटना
अज्ञात वाहनाची कारला धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार तर एकजण जखमी झाला. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील हंचिनाळ क्रॉसनजीक ही घटना घडली. संजुहितारा गौडा (वय ३३), नागराज यादव (वय ३४) दोघेही (मूळचे रा. गोकाक ता. बेळगाव, सध्या रा. सिंदगी ) अशी मृतांची नावे आहेत. तर आसिफ मुल्ला (वय २४) हा या अपघातात जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी सिंदगीच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद सिंदगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments