विजयपूर / वार्ताहर
मालवाहक गाडी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर अन्य तिघेजण जखमी झाले. हरीश (रा. विजयपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. विजयपूर शहरातील बेंगळूर - सोलापूर महामार्गानजीक जेएसएस रुग्णालयाजवळ गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, मालवाहक गाडी विजयपूरहून आलमट्टीच्या दिशेने निघाली होती. याचवेळी सर्व्हिस रोड वरून विजयपूरच्या दिशेने निघालेल्या दुचाकी स्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मालवाहक गाडीला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना अधिक उपचारासाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच विजयपुरच्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची नोंद विजयपूर वाहतूक पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments