सांबरा / मोहन हरजी

सांबरा येथील सरकारी प्राथमिक शाळेचा 145 वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी नूतन एसडीएमसी सदस्यांचे स्वागत आणि माजी सदस्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी माजी अध्यक्ष महादेव अष्टेकर होते.

आजी-माजी एसडीएमसी सदस्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शाळेला बायोमेट्रिक मशिन देणगी दिल्याबद्दल सागर जोगाणी, दीपक जोई यांचा राजू जयस्वार आणि महादेव अष्टेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. महादेव अष्टेकर, यल्लाप्पा हरजी आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यपिका ए. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आर. बी. लोहार यांनी आभासक्रम आणि बोर्डाच्या परीक्षेबद्दल महिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.

कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी, उपाध्यक्षा सुनीता जत्राटी, सदस्य दीपक जाधव, लक्ष्मण जोई, महेश जत्राटी, अनिल चौगुले, तानाजी कलखांबकर, अशोक गिरमल, अशोक लोहार, सुमन गिरमल, नागेश गिरमल, लक्ष्मण गुरव, सुनिता सोनजी, रूपाली गुरव रेश्मा हुच्ची,पूजा लोहार, सुधा गिरमल, सुजल शिरल्याचे, ज्योती चुनारी, दीपाली धर्मोजी, लक्ष्मी चौगले, लक्ष्मी हिरोजी आदी मान्यवर उपस्थित होते. व्ही. एस. कंग्राळकर यांनी सूत्रसंचालन तर टी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.

वर्धापनदिनानिमित्त शाळेला आकर्षक विद्युत रोषणाई करुन फुलांच्या हारानी सजावण्यात आले होते.