विजयपूर / वार्ताहर

ऊस पिकाला अचानक लागलेल्या आगीत सुमारे दोन एकरातील ऊस जळून भस्मसात झाला.मुळवाडा (ता.कोल्हार;जि.विजयपूर)  येथे झालेल्या या आगीच्या दुर्घटनेत शंकर महादेवप्पा कळसगौंड यांचा दोन एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने या शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना मनगुळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.