सांबरा / मोहन हरजी

सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण उत्तमरीत्या पार पडले. सुमारे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणात देशाच्या विविध राज्यातील सुमारे  २८५० अग्निवीर जवानांनी सहभाग घेऊन चांगली कामगिरी केली.


आज शुक्रवारी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये  भारतीय वायुसेनेचे कमांडिंग ऑफिसर  मन मनमेंद्रसिंग यांनी प्रशिक्षण सरावात सहभागी होऊन सर्व अग्निवीर जवानांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर हवाई दलाची माहिती दिली. यावेळी बेळगावचे एअर कमांडर एस. श्रीधर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रशिक्षण स्थळांना भेट दिली. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा व प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना सन्मानित करण्यात आले. देशसेवेसाठी आलेल्या सर्वांना चांगले काम करून देशसेवेसाठी सज्ज व्हा, देशातील अधिकाधिक तरुणांनी अग्निविर वायू सैनिक व्हावे  असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

एकंदरीत बेळगाव येथे प्रथमच  झालेले  अग्निवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.