• विघ्नहर्ता स्पोर्ट्स सुळगा (हिं.) यांच्यातर्फे आयोजन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

सुळगा (हिं.) येथील विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्यातर्फे सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथे रविवार दि.२५ डिसेंबर रोजी "भव्य ओपन खो-खो स्पर्धा" पर्व - १ आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा गावातील ब्रह्मलिंग हायस्कूलच्या पटांगणावर होणार असून रविवारी सायंकाळी ठीक ७.०० या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समिती युवा नेते आर. एम. चौगुले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी मनोहर किणेकर, (माजी आमदार ग्रामीण बेळगाव) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे तर बळवंत धा. कदम, (विजय ट्रेडर्स सुळगा) यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन होणार आहे. त्याचप्रमाणे  शिवाजी सुंठकर (माजी महापौर बेळगाव) ॲड. सुधीर चव्हाण, (बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष), संतोष मंडलिक (म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष), आर. आय. पाटील (सौंदर्या पेंट्स मालक) चेतन पाटील (आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष), ॲड. एम. जी.पाटील व ॲड. शाम पाटील यांच्या शुभहस्ते  दीप प्रज्वलन होणार असून मैदान पूजन  सुनील ग. खांडेकर (ब्रह्मलिंग स्पोर्ट्स बेनकनहळळी संघमालक) यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ११,००१/- आर. एम. चौगुले (म. ए. समिती युवा नेते, बेळगाव) तर प्रथम चषक नयन बळवंत कदम, (विजय ट्रेडर्स) यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय पारितोषिक रु. ५००१/- सुनील गणपत खांडेकर (ब्रह्मलिंग स्पोर्ट्स, बेळगाव) तर द्वितीय चषक गणपत लक्ष्मण कलखांबकर फर्निचर कॉन्ट्रॅक्टर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी रु.  १२००/- प्रवेश शुल्क आहे.

  •  नियम व अटी 👇
  • बेळगाव जिल्हा मर्यादित एक गाव एक संघ असेल 
  • बेळगाव जिल्हा सोडून बाहेरील संघ एक गाव एक संघ नसेल
  • बेळगावमधील खेळाडूला बेळगाव जिल्हा सोडून बाहेर खेळता येणार नाही 
  • मंडळाला शंका आल्यास मुळ आधार कार्ड दाखविणे
  • पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल 

तरी इच्छुक संघांनी, नागेश - ९७३१०६३८००, महेश - ९९८०७०६२८१, सुयश - ९६२०९२४९७० यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावी असे आवाहन विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबतर्फे करण्यात आले आहे.