• आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कल्लेहोळ गावातील रस्त्यांच्या  विकासासाठी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पंचायत राज अभियांत्रिकी विभागाच्या वतीने 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज शनिवारी भूमिपूजन करून आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्ताच्या  कामाला चालना दिली.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या माध्यमातून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवली जात आहेत. दररोज मतदार संघातील 4 ते 5 गावांमध्ये विकास कामांचा शुभारंभ करून चालना देण्यासाठी त्या स्वतः कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

या अंतर्गत कल्लेहोळ गावात आज शनिवारी पंचायतराज अभियांत्रिकी विभागामार्फत उपलब्ध झालेल्या 60 लाख रु.निधीतून रस्ता कामाला प्रारंभ झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी महेश पाटील, अक्षय पाटील, संजय पाटील, एल. एन. पाटील, अक्षय खन्नूकर, रमेश खन्नूकर, महादेव पाटील, अजित पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह  इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

-मयत शेतकरी राजू हन्नूरकर यांच्या कुटुंबियांकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द -

याचवेळी दि. 9 जानेवारी 2022 रोजी (सहा महिन्यापूर्वी) कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कल्लेहोळ गावातील शेतकरी राजू खाचू हन्नूरकर यांच्या कुटुंबियांकरिता कृषी खात्याकडे घटनेचा पाठपुरावा करून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर केली. आज आर्थिक मदतीचा धनादेश त्यांनी मयत राजू यांची पत्नी रोहिणी हन्नूरकर यांच्याकडे सुपूर्द केला. याकामात माजी ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.