• बेळगाव जिल्हा एनपीएस कर्मचाऱ्यांची मागणी
  • आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले निवेदन

 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्हा एनपीएस युनिट कर्मचाऱ्यांनी ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने रविवार 4 डिसेंबर रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ओपीएस लागू करण्याच्या मागणीचे निवेदन  दिले.

निवेदन देऊन यावेळी आपल्या मागणी संदर्भात एन.पी.एस.बेळगाव जिल्हाध्यक्ष एन.टी.लोकेश कुमार यांनी माहिती दिली आणि आपली समस्या सोडवण्याची विनंती आमदारांना केली . 

यावेळी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाने एनपीएस कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला असल्याचे संघाच्या कोणी यांनी सांगितले .

यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या कर्मचाऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून , 2006 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले.यावेळी एनपीएस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.