- मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला अन्यायकारक पद्धतीने परवानगी नाकारून मराठी भाषिकांवर दडपशाही केलेल्या जुलमी कर्नाटक सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्याकरिता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दि.२६ डिसेंबर रोजी 'चलो कोल्हापूरचा' नारा दिला आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा मंदिरच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
व्हिडिओ पहा 👇
दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ८ वा. एसपीएम रोडवरील उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर दुचाकीने कोल्हापुरला जात तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून कर्नाटकच्या दडपशाहीचा महाराष्ट्रात निषेध करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी, रणजीत चव्हाण- पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments