• कालव्यात उडी घेऊन संपविले जीवन

विजयपूर / वार्ताहर 

कौटुंबिक वादातून एका महिलेने स्वतःच्या दोन मुलींसह कालव्यात उडी  घेऊन आत्महत्या  केली. उक्कली (ताबसवनबागेवाडी, जि. विजयपूर ) येथे ही घटना घडली.  रेणुका अमीनप्पा कोनिन  (वय २६ वर्षे असे मृत महिलेचे तर यल्लवा (वय २ वर्षे), अमृता (वय १ वर्ष )अशी मृत अल्पवयीन मुलींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी रेणुकाचे पतीशी भांडण झाले होते. या रागाने दोन्ही मुलींना सोबत घेऊन ती घराबाहेर पडली होती. तेव्हापासून पती आणि त्याचे कुटुंबीय रेणुका आणि तिच्या दोन्ही मुलींचा शोध घेत होते. मात्र तिला शोधण्यात अपयश आल्याने अखेर काल सोमवार दि१२ डिसेंबर रोजी मनगुळी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

यानंतर आज उक्कली गावाबाहेरील मुळवाड उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात रेणुका आणि तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ मनगुळी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच मनगुळी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक परशुराम त्याने सहकाऱ्यांचा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मनगुळीच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. अजूनही स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून अन्य एका मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
या घटनेची नोंद मनगुळी पोलीस स्थानकात झाली असून रेणुकाच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.