विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील हविनाळ येथील इंडियन शुगर (श्री दत्त इंडिया) चा गळीत हंगाम सुरू होऊन 30 दिवस झाले असून आजपर्यंत 97 हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. पहिल्या पंधरवड्याची ऊस बिले वेळेत या अगोदरच शेतकऱ्यांचा खात्यावर वर्ग करण्यात आले असून, तर दुसरा पंधरवडा दि. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गळीतास पाठविलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांची पंधरवडा ऊस बिले दोनच दिवसात जाहीर केलेल्या दरानुसार 978 शेतकऱ्यांची 13 कोटी 46 लाख 28 हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांचा बॅक खात्यात जमा केली असल्याची माहिती उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली आहे.
या पुढेही गळीतास येणाऱ्या ऊसाची बिले वेळेत जमा केले जातील व शेतकऱ्यांचे व तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे हित लक्षात घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला पिकविलेल्या ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावे असे आवाहन मृत्युंजय शिंदे यांनी केले.
या प्रसंगी कंपनीचे संचालक चेतन धारू, करण रुपारेल, परिक्षित रुपारेल जनरल मॅनेजर शरद मोरे, फायनान्स मॅनेजर अमोल शिंदे, नवनाथ पाटील, अनिरुद्ध पाटील, रविंद्र गायकवाड, व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments