सुळगा (हिं.) / वार्ताहर

गत साडेचार वर्षात ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे केली आहेत. यावेळी ग्रामीण भागातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या बाळेकुंद्री (खुर्द) गावातील रस्ते व नाल्यांच्या विकासाकरिता एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विकासासाठी सातत्याने काम करत असून यापूर्वी ग्रामीण मतदारसंघात एवढ्या प्रमाणात विकास कामे झाली नव्हती. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या राहणीमानात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचे माझे ध्येय असल्याचेही त्या म्हणाल्या. 

यानंतर गावात महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी दाखवलेल्या प्रेमापुढे आपण नतमस्तक होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही विचार मांडले.

याप्रसंगी डॉ. अस्की, नमसय्या हिरेमठ, महादेवी रामचन्नवर, अनुसूया रामचन्नवर, रुबीना शेख, मंगला बागनवर, अंजना बेळगावकर, यल्लन्ना बबनवर, निलेश चंदगडकर विठ्ठल कुरुबर, मारुती सुळगेकर रवी बालन, वरेश चंदराव, सुरेंद्र चंदगडकर, विठ्ठल कुरूबर, पंडित चंदगडकर यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.