विजयपूर / वार्ताहर 

कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. यावेळी सदर कारची अन्य एका कारलाही धडक बसली. विजयपूर तालुक्याच्या जुमनाळ क्रॉसनजीक मंगळवारी रात्री उशिरा विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. अक्षय, शुभम आणि बागेश (तिघेही रा. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत.

भरधाव वेगात असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी  घटनास्थळी भेट देऊन  पंचनामा केला. आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.