• दि. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार स्पर्धा
  • संचालिका प्रेरणा घाडगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी

लव्हडेल सेंट्रल स्कूलतर्फे, सीबीएसई 18 वर्षाखालील क्लस्टर लेव्हल फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती, संस्थेच्या संचालिका प्रेरणा घाडगे यांनी गुरुवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत बोलताना संचालिका प्रेरणा गाडगे म्हणाल्या, शनिवार दि. 3 ते सोमवार दि. 5 डिसेंबर दरम्यान शाळेच्या मैदानावर दिवस - रात्र हे सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५६  संघ आणि बेंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडपी दावणगेरे, विजयपूर, मंड्या, बिदर, कोप्पळ, बळळारी, चित्रदुर्ग, गदग रायचूर, शिमोगा, रामनगर, तुमकुर हुबळी,धारवाड आदि ठिकाणचे ८०० हून अधिक फुटबॉलपटू सहभागी होणार आहेत. सोमवार दि. ५  डिसेंबर रोजी स्पर्धेची सांगता झाल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार असून विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल, क्रीडा शिक्षक बसू अगसगी, विनायक मोरे, कलमेश एच.आदि उपस्थित होते.