• अध्यक्षपदी मोहन हरजी आणि उपाध्यक्षपदी सुनिता जत्राटी यांची बिनविरोध निवड

सांबरा / वार्ताहर

सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी मोहन हरजी आणि उपाध्यक्षपदी सुनिता जत्राटी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

शाळा सुधारणा कमिटीचा कार्यकाळ समाप्त झाल्याने आज ग्रामपंचायत पीडिओ आरती अष्टगी, अध्यक्षा रंजना आप्पयाचे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. 18 जागासाठी 19 पालकांनी सहभाग घेतला. एका महिला अर्जदाराने माघार घेतल्याने निवड बिनविरोध झाली. सदस्य म्हणून दीपक जाधव, लक्ष्मण जोई, महेश जत्राटी, अनिल चौगुले, तानाजी कलखांबकर, अशोक गिरमल, यल्लाप्पा हरजी, अशोक लोहार, सुनिता सोनजी, रूपाली गुरव रेश्मा हुच्ची,पूजा लोहार, सुधा गिरमल, सुजल शिरल्याचे, ज्योती चुनारी, दीपाली धर्मोजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा कांबळे विक्रम सोनजी शंकर यड्डी, मारुती जोगानी, लक्ष्मण कोळ्यापगोळ, महेश कुलकर्णी, पुंडलिक जत्राटी, प्रशांत गिरमल, श्वेता बमनवाडी, सपना तलवार, कल्लाप्पा सोनजी, राजू जयस्वार, प्रकाश चौगुले, मुख्याध्यापिका ए. ए. पाटील , व्ही. एस. कंग्राळकर , ए.बी. पागाद, टी. व्ही. पाटील , आर. बी. लोहार, श्रीमती हलगेकर आदी शिक्षक यांच्यासह पालक बहुसंख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या अध्यक्ष- उपाध्यक्षचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.