•  शेतकरी नेते प्रकाश नायक यांचे आमदार आणि मंत्र्यांना आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेचे १४ वे अधिवेशन दि. १९ ते ३० डिसेंबर दरम्यान बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे होणार आहे. या अधिवेशन काळात होणारी पैशांची उधळपट्टी कमी करण्यासाठी आमदारांनी मंत्र्यांनी खासगी हॉटेलमध्ये न राहता गावातील शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करावा शेतकऱ्यांच्या घरी राहून सर्व लोकप्रतिनिधी व उच्च पदस्थांना आपले प्रेम आदरभाव दाखवावा  असे आवाहन कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते प्रकाश नायक यांनी केले.मंगळवारी शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत प्रकाश नायक पुढे म्हणाले, हिवाळी अधिवेशनात शेतीच्या समस्येवर तोडगा काढण्याबरोबरच कोरोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा ठराव पास करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते उपस्थित होते.