विजयपूर / दिपक शिंत्रे
स्विफ्ट डिझायर कारची रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत विजयपूर जिल्ह्यातील सिंदगीचे सीपीआय आणि त्यांची पत्नी जागीच ठार झाले.कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील नेलोगी क्रॉसनजीक हा भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर जिल्ह्यातील सिंदगी पोलीस स्थानकाचे सीपीआय रवी उकुंद (वय ४३) आणि त्यांची पत्नी मधु (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला.
सिंदगीहून कलबुर्गी शहरात येत असलेल्या सीपीआय उकुंद दाम्पत्याच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नेलोगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments