खानापूर / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक नवीन ट्रकची चेसी रस्त्यानजीक कलंडली. खानापूर- हल्याळ राज्य महामार्गावरील होनम्मादेवी तलावासमोरील वळणावर काल मध्यरात्री दोन वर्षाच्या सुमारास ही घटना घडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून याकडे लक्ष दिले जात नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. रस्ता सुस्थितीत नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याप्रकरणाची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments