विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेतील पहिला बाधित रुग्ण आढळून आला आहे. विजयपूर शहरातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र भितीचे वातावरण आहे.

सदर रुग्णाची आरटीपीसीआर आणि कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्यावर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची प्रकृती ठीक असून अन्य कोणतीही अडचण नसल्याने सदर व्यक्तीला कोरोना संसर्ग होण्याचे नेमके कारण काय याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी घेत आहेत.