- हुबळी केशवपूर पोलिसांची कारवाई
हुबळी / वार्ताहर
दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना हुबळीतील केशवपूर पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 9 दुचाकी जप्त केल्या आहेत. यापैकी दोन दुचाकी चोरीचे गुन्हे केशवपूर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. तर उर्वरित सात दुचाकी मालकांचा आणि चोरीच्या घटना कोणत्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्या आहेत याचा तपास सुरू आहे.
दुचाकी चोरीच्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात यश मिळवलेल्या हुबळी केशवपूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जगदीश हंचनाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे हुबळी - धारवाड पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
0 Comments