निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेले आश्वासन मी प्रामाणिकपणे पूर्ण केले असून गत साडेचार वर्षात बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा ऐतिहासिक विकास झाला असल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. मारिहाळ (ता. बेळगाव) येथे महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाचा शुभारंभ करून त्या बोलत होत्या.
यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मारिहाळ गावात झालेल्या सर्व विकास कामांची आठवण करून देत बेळगाव ग्रामीण भागातील सर्वसमावेशक विकास कामांची माहिती दिली. तसेच २०१४ साली निवडणुकीपूर्वी याच मारिहाळ गावात अवघ्या ५ वर्षात २५ वर्षांचा विकास करून दाखविण्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने अवघ्या साडेचार वर्षांमध्येच बेळगाव ग्रामीण मतदारसंघात अभूतपूर्व विकासकामे केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, रामचंद्र चौहान, अप्पासाब बागवान, बसवराज हित्तलमणी, प्रकाश यल्लप्पण्णावर, बसवराज मोदगी, अनंत साळुंके, गौडप्पा पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला, मारिहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments