बेळगाव / प्रतिनिधी 

टाकाऊ अन्न खाल्ल्यामुळे एका मेंढपाळाच्या १० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना  बेळगाव शहरानजीक कोंडुसकोप्प गावाजवळील माळवर आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. अचानकपणे १० मेंढ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी आनंद पाटील यांनी टाकाऊ अन्न खाल्ल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. शेळ्या - मेंढ्यांना  काही आजार झाल्यास मेंढपाळांनी नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


दरम्यान, माळावर मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची बातमी समजताच कोंडुस्कोप्प ग्रामस्थांनी माळरानावर मोठी गर्दी केली होती.