- सैनिक परिवारावर शोककळा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला शोक
![]() |
(सिक्कीम आर्मी ट्रक अपघात ,फोटो सौजन्य : ANI) |
सिक्कीम दि. २३ डिसेंबर :
उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला असून चार जवान जखमी झाले आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाल्या होत्या. झेमा येथे वळणावर मोठा उतार होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.
दरीत कोसळलेल्या ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवानांचा मृत्यू झाला आहे, असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदींसह देशातील बड्या नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ही धक्कादायक बातमी ऐकून खूप दु:ख झाले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांना आदरांजली, असे मोदींनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विट
या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. “उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या रस्ते अपघातात लष्कराच्या निधनामुळे दु:ख झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबीयाप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी जवान लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विट
0 Comments