बेळगाव / प्रतिनिधी 

चिन्मय मिशन तर्फे घेण्यात आलेल्या गीता पठण स्पर्धेत शिवांश प्रवीण पिळणकर याने जूनियर व सीनियर केजी गटातून गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील १ ते ७ श्लोक  पठणामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर स्पर्धा भाग्यनगर चौथा क्रॉस येथील चिन्मय मिशन श्रीकृष्ण मंदिरात रविवार दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. नर्सरी  (श्लोक संख्या १ ते ५), एलकेजी- युकेजी (श्लोक  संख्या १ ते ७), पहिली ते दुसरी  (श्लोक संख्या १ ते १२), तिसरी-चौथी (श्लोक संख्या १ ते १७), पाचवी - सहावी (श्लोक संख्या १ ते २२), सातवी-आठवी (श्लोक संख्या १ ते २७), नववी ते दहावी  (श्लोक संख्या १ ते ३२) अशा इयत्तेनुसार घेण्यात घेण्यात आली होती.