• आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन अन् उद्घाटन  

सुळगा (हिं.) / वार्ताहर

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर अनुदानातून बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या तुमरगुद्दी गावातील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर  यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. याबरोबरच गावात नवीन व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावातील युवकांनी या सुविधेचा लाभ घेऊन सशक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

याचवेळी गावात महिलांसाठी आयोजित केलेल्या हळद- कुंकू कार्यक्रमातही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी झाल्या.आमदार या नात्याने बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या केलेल्या विकासाचे प्रतिबिंब हळदी-कुंकू कार्यक्रमातून दिसत आहे. भविष्यातही अनेक विकासकामे होणार आहेत. मतदारसंघातील जनतेचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने  मी समर्थपणे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. कोरोना काळात अतिशय बिकट परिस्थितीत मतदार संघातील जनतेच्या समस्या समजावून घेतल्या आणि जमेल त्या पद्धतीने सर्वांना तात्काळ प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद सदस्य  चन्नराज हट्टीहोळी यांनीही आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला  परशुराम पुजेरी, प्रकाश शिनगी, सत्यव्वा शिनगी, कमलम्मा महार, सुरेश नाईक, शेखर होसुरी, बसनगौडा पाटील, बाळाप्पा शिनगी, सत्याप्पा नंद्यागोळ, लक्ष्मण  केंपादिन्नी, शिवाजी तलवार, शिवशंकर पाटील, शेखरनाथ शिनगी, शेखर शिनगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.