•  कर्नाटक विधान परिषदेतही ठराव मंजूर

बेळगाव / प्रतिनिधी 
 
महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला

कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, हरिप्रसाद, प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, तेजस्विनी गौडा, प्रकाश राठोड, रवीकुमार रमेश आदी सदस्यांनी विचार मांडून कर्नाटकाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.