बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या 'फोन-इन कार्यक्रमाला' उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या विविध भागातून लोकांनी फोन करून आपल्या समस्या मांडल्या. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घेतलेल्या 'फोन-इन कार्यक्रमात' अवैध सराईत व मटक्याचा त्रास वाढला असून, त्यांना आळा घालण्याची मागणी जनतेने केली.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी तुमची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल असे सांगितले. शहरातील शासकीय शाळांच्या आवारात तंबाखू विक्रीसह अंमली पदार्थांची विक्री होत आहे. याला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्वरित उत्तर देत जिल्ह्यातील शाळांच्या परिसराजवळ अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले. या कार्यक्रमात अनेक फोन कॉल्स बेळगाव जिल्हा तसेच बेळगाव शहरातूनही करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी उपरोक्त आयुक्तांना कळवून नागरिकांना समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
0 Comments