सुळगा (हिं.) / वार्ताहर
दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर होन्नीहाळ (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या होन्नीहाळ गावातील श्री हनुमान नगर (डिफेन्स कॉलनी) येथे आज आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
मागील आमदारांच्या कार्यकाळात ग्रामस्थांनी रस्ते विकसित करण्यासाठी अनेक वेळा विनंती केली होती. पण ते शक्य झाले नाही. मात्र विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांनी मागणी करताच रस्ता विकसित करण्याचे आश्वासन दिले आणि ते पूर्णही केले. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यामुळेच आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तुमचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी विनंती ग्रामस्थांना केली.
याप्रसंगी स्थानिक नागरिक सिद्धप्पा तायकर, रवी केंगेरी, डी. बी. हंजी, मल्लिकार्जुन थिगडी, सिद्धनगौडा पाटील, महांतेश हिरेमठ, प्रकाश मारिहाळ, रघु पाटील, बसनगौडा पाटील, रमणगौडा पाटील, मालती सुबनूर, शोभा एम. तिगडी, सविता तायकर, डॉ. गिरीजा तायगर, शोभा पाटील, रूपा पाटील, चन्नम्मा पाटील, सुमित्रा सिंगाडी, सुजाता, दीपा नवलगी, दीपा मारिहाळ यांच्यासह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
0 Comments