सदलगा / वार्ताहर

लंम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सदलगा (ता. चिक्कोडी) शहर परिसरातील अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून शेकडो गायींना याची लागण झाली आहे.

लंम्पी स्कीन रोगाची लागण सजलगाव शहरातील बहिनाकवाडी, मलिकवाड, जनवाड, शिरदवाड, एकसंबा, नेज, वडगोल, शमनेवाडी या भागातील गायींना झाली आहे. सदलगा शहरात जनावरांची संख्या जास्त आहे. पशुवैद्यकीय रुग्णालय असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. गरीब शेतकरी जनावरांवर उपचार करण्याविना सरकार लक्ष घालून या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल अशी आशा बाळगून आहेत. काहीजण खाजगी दवाखान्यांमध्ये जनावरांवर उपचार करून घेत आहेत. मात्र ही बाब खर्चिक आहे. तेव्हा आता तरी शासनाने याची दखल घेऊन शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी सदलगा शहरातील नागरिक करत आहेत.