खानापूर / प्रतिनिधी
खानापूर येथे दि. 6 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या KPL season 2 मध्ये कलमेश्वर क्रिकेट क्लब अनगडी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रेमराज वॉरियर्स संघावर मात करून अनगडी संघाने विजेतेपद पटकाविले.
कर्णधार पांडुरंग गंगाराम भुत्तेवाडकर याच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना बलाढ्य संघांवर विजय मिळवत स्पर्धेतील साखळी सामने एकतर्फी जिंकले होते.
विजयी संघात, पांडुरंग भुत्तेवाडकर (कर्णधार) राजू मातवंडकर उमेश दुर्गद ,लक्ष्मण गावडे, रामनाथ सुखे, महाबळेश्वर गांवकर , किरण सुतार , प्रमोद पाटील , परशुराम मिराशी , श्रीनाथ मळीक ,दत्ता कुंभार आदि खेळाडू सहभागी होते.
0 Comments