सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची विकास कामे सुरू आहेत. हिंडलगा, मण्णूर, अतिवाड, कोवाड या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज बेकिनकेरे येथे  करण्यात आले.

भूमिपूजनानंतर बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, गत साडेचार वर्षात बहुतांश रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. यापुढील काळात  विकासात्मक प्रकल्प राबवणे करता जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य भावकू सावंत, बळवंत भोगण, राजू सावंत लक्ष्मी सावंत, रघुनाथ खांडेकर, मल्लाप्पा गावडे, नारायण सावंत, अरुण गावडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.