- गळफास घेऊन संपविले जीवन
विजयपूर / वार्ताहर
विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील एका तरुण पत्रकाराने त्याच्या पत्नीसहित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .
युवा पत्रकार तिप्पण्णा सिद्धाप्पा होसमनी (वय 34 ), आणि त्याची पत्नी सुजाता (वय 30 ) यांनी विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील एपीएमसीजवळील खोल गळफास घेऊन आत्महत्या केली . तिप्पण्णा हा बेंगळूर येथील खाजगी वाहिनीत कॅमेरामन होता. त्याने काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती .
मुद्देबिहाळ तालुक्यातील कोण्णूर येथील रहिवासी असलेल्या तिप्पण्णा याने 4 – 5 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता . पती पत्नी दोघेही गावी राहत होते .
0 Comments