बेळगाव ग्रामीण मतदारसंघात गत साडेचार वर्षात राबविण्यात आलेल्या अभूतपूर्व विकास कामांचा अभिमान वाटतो, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सरस्वतीनगर येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
जनतेची नि:स्वार्थी सेवा आणि विकास कामांच्या माध्यमातून ग्रामीण मतदारसंघाचे नेतृत्व केले. तुम्हा सर्वांचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव आहे, जो मी कधीही विसरणार नाही असेही त्या म्हणाल्या. नेहमीप्रमाणेच यापुढेही तुमचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला युवराजअण्णा कदम, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, मोहन सांबरेकर, राजेश नाईक, अंजना नाईक, मंजुळा नाईक, शीला सांबरेकर, शाहीराबानू हुक्केरी, यल्लाप्पा नाईक, राजू दंडगलकर, भरमाण्णा हलगेकर, जोतिबा पाटील, अनुराधा वाघमारे, पद्मा हलकुट्टी, सचिन जाधव, जैनुद्दीन मुजावर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments