- आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते चालना
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेळगुंदी ते बेळगाव रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 1.40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आज सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कल्लेहोळ क्रॉस परिसरात भूमिपूजन करून रस्ताच्या बांधकामाला चालना देण्यात आली.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चून ग्रामीण मतदार संघातील अनेक रस्ते विकसित करण्यात आले आहेत. रस्त्यांच्या बाबतीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघ राज्यात आदर्श बनावा याकरिता रस्त्यांचा विकास साधला जात आहे. पुढील काळात विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सुळगा ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला कलखांबकर, मनोहर बेळगावकर, महेश पाटील, नामदेव मोरे, मल्लाप्पा पाटील, शिवाजी पाटील, भागाण्णा नरोटी, मनोहर पाटील, रेहमान तहसीलदार, शिवाजी बेटगिरीकर, शिवाजी बोकडे, महादेव पाटील, प्रभाकर चिरमुरकर, निंगुली चव्हाण, वनिता पाटील, मारुती पाटील, मदन बिजगर्णीकर, परशुराम येळळूरकर, विलास पाटील, धाकलू पाटील, प्रभाकर पाटील, रंजना गावडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments