सुळगा (हिं.) / वार्ताहर

विधान परिषदेचे आमदार हणमंत निराणी यांच्या अनुदानातून विजयनगर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने 4×10 फूट लांबी रुंदीचे 7 ग्रीन बोर्ड देण्यात आले.

यावेळी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील मराठी आणि कन्नड शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे. भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून उत्कृष्ट प्रतीचे ग्रीन बोर्ड देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आला आहे. येत्या काळात सर्व शाळांना ग्रीन बोर्ड वितरित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हणमंत निराणी यांच्या अनुदानातून हे कार्य सुरू करण्यात आले आहे. खडू आणि फळा हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला दुवा आहेत. याच्या माध्यमातून मुलांना विद्यादान केले जाते. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे याच हेतूने हे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गीता कडोलकर यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शैलेश उळवी, हिंडलगा ग्रा. पं. माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, हिंडलगा ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, नगरसेविका विणा विजापुरे, विलास तशिलदार अजित हलकर्णी, अरुण काळसेकर, गुरुराज हलगत्ती, अनिल मद्यापगोळ, गणपत देसाई, रणजीत पोटे, आदींसह शाळेचे सर्व शिक्षक व एसडीएमसीचे सर्व सदस्य उपस्थित होते.