बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्यावतीने आज मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुर्ननिरिक्षण करण्याबाबत सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बुधवारी सकाळी किल्ला तलावानजीक या मतदार यादी पुर्नरिक्षण जनजागृती रॅलीला झेंडा दाखवून चालना दिली.
किल्ला तलाव अशोक सर्कल पासून निघालेल्या सायकल रॅलीची,आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकात सांगता झाली. रॅलीत बेळगाव पेडलर क्लबच्या सदस्यांनी ही सहभाग घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आदि उपस्थित होते.
0 Comments