सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या कल्लेहोळ गावातील हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांच्या हस्तकलेची माहिती घेतली व परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेताना उपस्थितांना त्याची आठवण करून दिली.

यावेळी गावात यापूर्वी कधीही न झालेली विकासकामे हाती घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. दरम्यान, गावातील महिलांनीही त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह इतरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी ग्रामस्थ अश्विनी कन्नुरकर, एल.एन.पाटील, युवराज कदम, वसंत पाटील, निर्मला शहापुरकर, धनश्री पाटील, कृष्णा पाटील, लक्ष्मण कणबरकर, राजाराम देवरामणी, पांडुरंगा देवरामणी, स्वराज युवक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.