• उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई / प्रतिनिधी 

सीमाप्रश्नाच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

बैठकीत महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी पुढील हालचालीसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच शंभूराजे देसाई यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येणाऱ्या काही दिवसात या प्रश्नावर पंतप्रधानांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले.