- चार लाखाचा गांजा जप्त
- सीईएन पोलिसांची कारवाई
हुबळी / वार्ताहर
बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशातील दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. हुबळी शहरातील गदग रोड रेल्वे रुग्णालयानजीक सीईएन पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आंध्रप्रदेशामधून महाविद्यालयीन बॅगेतून गांजा आणत येथील गदग रोडवर विक्री सुरू केली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून सीईएन गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, अन्नपूर्णा आर. एम. यांनी झाड घालून दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या कडून अंदाजे 4 लाख 20 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हुबळी सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments